Site icon सक्रिय न्यूज

भर वस्तीत नारळाच्या झाडावर वीज कोसळली, बीड जिल्ह्यातील तेलगाव येथील घटना

बीड दि.18 – मागच्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांसह सर्वसामान्य लोकांना बसत आहे. वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे.
       त्यातच बुधवारी रात्री बीड जिल्ह्यातील तेलगाव येथील भर चौकात परळी रोडवर माऊली मेवाड हॉटेल जवळ असलेल्या बापूराव लगड यांच्या दुकानासमोरील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. त्यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र नारळाच्या वरच्या भागावर बराचवेळ आग लागलेली दिसत होती.
      तर जिल्ह्यातील इतर कांही भागातही अवकाळी चा तडाखा बसला असून गुरुवारी सकाळी केज तालुक्यात अवकाळी बरसला. त्यामुळे कांही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
शेअर करा
Exit mobile version