पुणे दि.१८ – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेल्या अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अरुण राठोडची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकारी करणार आहेत.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकराची एकूण तीन पथकं चौकशी करत आहेत. याअगोदर पोलीस पूजाच्या आई वडिलांचा जबाबही घेणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, काल पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीचा यवतमाळच्या रुग्णालयात गर्भपात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यानंतर अनेक तर्क-वितर्क लावले जात होते.