परभणी दि.20 – कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेले 5 वी ते 9 वी व अकरावीचे वर्ग तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी काढले असून सदरील वर्ग पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत.
मागच्या कांही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र संख्या कमी झाली होती तेंव्हा सुरुवातीला 9 वी ते 12 वी आणि नंतर 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरू करण्यात आले होते.
दरम्यान वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा 5 वी ते 9 वी व अकरावीचे वर्ग बंद करण्याचे आदेश दिले असून सदरील वर्ग 28 फेब्रुवारी पर्यंत तात्पुरता स्वरूपात बंद राहतील असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.