Site icon सक्रिय न्यूज

लस घेतल्यानंतरही उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी कोरोना पॉजिटिव्ह

लस घेतल्यानंतरही उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी कोरोना पॉजिटिव्ह

उस्मानाबाद दि.21 – राज्यात कोरोना रूगणांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोनाची लस घेतली होती. मात्र, त्यानंतरही शनिवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

घाटकोपर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनाही कोरोनाची लस घेतल्यानंतर लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत होते. यापैकी एका पोलिसाला चार ते पाच दिवसांपासून करोनासदृष्य लक्षणे दिसत होती. त्यामुळे 18 फेब्रुवारी रोजी त्यांची कोरोनाची चाचणी केली होती. यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

तर या आधी लस टोचल्यानंतरही पुण्यात ससून रुग्णालयातील एका नर्सलाही पुन्हा कोरोना झाला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लस घेतल्यानंतरही या नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version