केज दि.21 – आज जाहीर करण्यात आलेल्या 419 कोरोना अहवालात जिल्ह्यात 53 रुग्ण बाधित आढळून आले असून केज तालुक्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात अंबाजोगाईत 19, आष्ठी 1, बीड 16, परळीत 5,पाटोदा 1, शिरूर 6, धारूर 1, गेवराई 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. तर केज तालुक्यातील काळेगाव घाट, येवता व नाहोली येथे प्रत्येकी 1 असे 3 रुग्ण आढळून आले आहेत.