Site icon सक्रिय न्यूज

वरपगाव येथे देशी दारू पकडली 

वरपगाव येथे देशी दारू पकडली 
केज दि.२१ – तालुक्यातील वरपगाव येथे छापा मारून पोलिसांनी २ हजार ४९६ रुपये किंमतीच्या देशी दारूच्या ४८ बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी चोरून देशी दारूची विक्री करणाऱ्या व्यक्तिविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
      वरपगाव येथील रोहीत तानाजी देशमुख या तरुणाचे चिंचोलीमाळी ते नांदुरघाट या रस्त्यावर ‘गारवा’ नावाचे हॉटेल सुरू असून तो हॉटेलमध्ये विनापरवाना व बेकायदेशीरपणे देशी दारूची चोरून विक्री करीत असल्याची माहिती केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांना मिळाली. त्यावरून चिंचोलीमाळी बिटचे जमादार अमोल गायकवाड, पोलीस नाईक अशोक गवळी, पोलीस नाईक अशोक नामदास यांच्या पथकाने रविवारी दुपारी ४.३० वाजता सदरील हॉटेलवर छापा मारला. यावेळी २ हजार ४९४ रुपये किंमतीच्या देशी दारूच्या १८० मिलीच्या ४८ बाटल्या पोलिसांना आढळून आल्याने तो माल जप्त करण्यात आला. पोना अशोक नामदास यांच्या फिर्यादीवरून रोहित देशमुख याच्याविरुध्द केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून जमादार अमोल गायकवाड पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version