Site icon सक्रिय न्यूज

स्विफ्ट- लक्झरी अपघातात पाच ठार……..!

स्विफ्ट- लक्झरी अपघातात पाच ठार……..!

अहमदनगर दि.22 – अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर स्विफ्ट आणि लक्झरी बसची समोरासमोर धडक झाली. श्री क्षेत्र देवगड फाटा भागात हा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात असलेल्या लक्झरी बसला रविवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अपघात झाला. औरंगाबादहून अहमदनगरच्या दिशेने जात असलेल्या स्विफ्ट कारची श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ बससोबत भीषण धडक झाली.

दरम्यान अपघात एवढा भीषण होता की, कार ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूवर धडकून तिचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात कारमधील पाच जणांना जागीच प्राण गमवावे लागले. मृत्युमुखी पडलेले सर्व जण जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

शेअर करा
Exit mobile version