Site icon सक्रिय न्यूज

ना.छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण, शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द…….!

ना.छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण, शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द…….!

नाशिक दि.22 – अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ट्विट करुन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती. लग्न सोहळा पार पडून 24 तासही उलटत नाहीत, तोपर्यंतच भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

        दरम्यान छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर शरद पवारांनी आपले सर्व कार्यक्रम 1 मार्च पर्यंत स्थगित केले आहेत.
शेअर करा
Exit mobile version