Site icon सक्रिय न्यूज

चालू बैठकीतच निराधार महिलेला संजय गांधी योजनेचा लाभ…….! 

चालू बैठकीतच निराधार महिलेला संजय गांधी योजनेचा लाभ…….! 
केज दि.२३ –  केज तालुका संजय गांधी निराधार समितीच्या दि.२२ रोजीच्या बैठकित फुलेनगर भागातील एक निराधार महिलेला समितीचे सदस्य कपिल मस्के यांनी समितीसमोर हजर करत त्या वृद्ध महिलेला या योजनेतून मानधन मिळावे अशी मागणी केली. यावेळी समितीचे अध्यक्ष बालासाहेब बोराडे व सर्व सदस्यांनी यासाठी तात्काळ मान्यता देऊन तात्काळ मंजुरी देण्याच्या निर्णय घेतल्याने बैठक संपण्या पूर्वीच निराधार महिलेला आधार मिळाला.
           संजय गांधी निराधार समितीच्या बैठकिमध्ये केज शहरातील फुले नगर भागात राहणाऱ्या निलावती बबन लोखंडे या ७० वर्षीय वृद्ध महिलेला कुठल्याही योजनेतून आर्थिक सहाय्य मिळत नव्हते. मात्र याची माहिती कपिल मस्के यांना मिळताच त्यांनी सदर वृद्ध महिलेला तहसिलदार व संजय गांधी निराधार समतीपुढेच हजर केले व सर्व हकीकत सांगितली. यावर समितीचे अध्यक्ष बालासाहेब बोराडे सह सर्व सदस्यांनी वंचित महिलेचा अर्ज मंजूर करण्याबाबत निर्णय घेतला. यावेळी तहसिलदार दुलाजी मेंडके, अध्यक्ष बालासाहेब बोराडे, कपिल मस्के, प्रणिता संतोष सोनवणे, रत्नाकर शिंदे, नारायण शिंदे, श्रीकांत घुले, सतिश गोरे, वचिष्ठ सांगळे, मधुकर तपसे, लक्ष्मण काळे आदी उपस्थित होते.
शेअर करा
Exit mobile version