केज दि.२५ – दारूचे व्यसन जडलेल्या एका २२ वर्षीय तरुणाने चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केल्याची घटना केज तालुक्यातील कौडगाव येथे घडली. अमोल बबनराव खाडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
कौडगाव येथील अमोल बबनराव खाडे ( वय २२ ) या तरुणास दारूचे व्यसन लागले होते. नेहमी दारूच्या नशेत राहत असलेला अमोल हा कुठल्याही प्रकारचा कामधंदा करीत नव्हता. त्यातच अमोल खाडे याने टोकाची भूमिका घेऊन २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता कौडगाव शिवारातील गावकर नावाच्या शेतात चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. संजय सुमाख पवार यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक सोनवणे हे पुढील तपास करत आहेत.