नांदेड दि.26 – मागच्या कांही वर्षांपूर्वी केज पोलीस ठाण्यात कार्यरत असताना अतिशय धाडसी कारवाया करत गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडणारे दबंग पोलीस अधिकारी यांना बढती मिळाली असून त्यांची पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी राज्यातील 438 सहायक पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देऊन पोलीस निरीक्षक केले आहे. नांदेड जिल्ह्यातील 7 सहायक पोलीस निरीक्षकांचा यात समावेश आहे.438 च्या यादीत नांदेड जिल्ह्यासाठी एक पोलीस निरीक्षक देण्यात आले आहेत. राज्यातील 438 सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचे आदेश आज निर्गमित झाले आहेत. त्यात नांदेड जिल्ह्यातील 7 सहायक पोलीस निरीक्षकांचा संदेश आहे. यामध्ये रमाकांत पांचाळ यांचाही समावेश असून मुंबई शहर पोलीस ठाण्यात त्यांना नेमणूक मिळाली आहे.
तर अशोक तुकाराम जाधव (नांदेड),विनोद मारोतीराव सलगरकर (औरंगाबाद शहर), सुनील चंद्रकांतराव नाईक (दहशतवाद विरोधी पथक),सुनील रावसाहेब पुंगळे (ठाणे शहर),सदानंद किशनराव येरेकर (मुंबई शहर),अनंत ज्ञानदेव भंडे (मुंबई शहर) यांनाही पदोन्नती मिळाली आहे.
सर्व पदोन्नती प्राप्त पोलीस निरीक्षकांना नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार ताबाला, पोलीस अधीक्षक प्रमोद
शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश
मोरे, विजय कबाडे, पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर धुमाळ, विक्रांत
गायकवाड, डॉ. सिद्धेश्वर भोरे, सचिन
सांगळे, पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे, द्वारकादास चिखलीकर, जगदीश भंडरवार, साहेबराव नरवाडे, महेश शर्मा, आनंदा नरुटे, अनिरुद्ध काकडे, अभिमन्यू साळुके आदींसह सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि त्यांच्या मित्रपरिवाराने अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.