बीड दि.26 – कोरोनाच्या एक वर्षाच्या काळात बेरोजगार झालेल्या तसेच पदवीधर असून देखील कौशल्याचा न्यूनगंड असलेल्या युवक-युवती साठी एक उत्तम संधी स्व.शालिनी केवडकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्किल अप इंडिया कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे या प्रोजेक्टचे समन्वयक शशी केवडकर आणि स्किल अप कंपनीचे सुजित शिंदे, नवनाथ खाडे यांनी सांगितले.
या प्रोजेक्ट विषयी आधिक माहिती देताना शशी केवडकर यांनी सांगितले की, सन 2020 वर्ष हे बेरोजगारीचे वर्ष असेच गेले. मात्र आपत्तीतून इष्ट आपत्ती शोधणाऱ्या साठी मात्र हे वर्ष अत्यंत प्रभावी ठरले. या वर्षात बँकीग क्षेत्रात खुप मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली आणि आता सन 2021 या वर्षात बँकीग क्षेत्राने कात टाकली. बँकीग क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर नौकरीच्या संधी उपलब्ध होत असून उत्तम कौशल्य अर्थात ज्याच्या कडे असे स्किल आहे अशा तरूण-तरूणीनां मल्टी नॅशनल बँकेत चांगल्या पगाराची नौकरी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अशा सर्वंकष कौशल्यासाठी अर्थात वेल स्किल डेव्हलपमेंट साठी स्किल अप इंडिया या कंपनीच्या माध्यमातून हे ट्रेनिंग आता बीड येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. या स्किल डेव्हलपमेंट साठी पदवीधर तरूण-तरूणीनी आजच आपल्या नावाची नोंदणी 7020439210 या मोबाईल क्रमांकावर करावी.
दरम्यान एकवीस दिवसाच्या या ट्रेनिंग प्रोजेक्ट साठी लवकरच बॅचेस तयार करण्यात येत असून इच्छुक आणि गरजु पदवीधर तरूण-तरूणीनी आपले नाव तात्काळ नोंदवावे असे आवाहन संयोजकानी केले आहे.