मुंबई दि.27 – खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिनेले गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने संजय राऊतांविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. ते माझी छळवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी तक्रार अर्ज शुक्रवारी एका उच्चशिक्षित महिलेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला. आपल्या मागे माणसं लावणं, हेरगिरी करणं, जिवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, धाक दाखवणं यासारख्या आरोपांसह विनयभंग केल्याचाही आरोप महिलेनं केला आहे.
सन 2013 मध्ये माझ्या रेस्टॉरंटबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्याविषयी माहिम पोलिस ठाण्यात आणि सन 2018 मध्ये माझ्या कारवर झालेल्या हल्ल्याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता. मात्र पोलिसांकडून याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी संजय राऊत यांचा साधा जबाबही नोंदवला नाही, असं या महिलेने याचिकेत म्हटलं आहे.
दरम्यान मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या या छळवणुकीविषयी गेल्या वर्षी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दाद मागितली. मात्र काही उपयोग झाला नाही, असंही या महिलेनं म्हटलं आहे.