Site icon सक्रिय न्यूज

पेपर लीक : सैन्य भरतीची परीक्षा रद्द…….!

पेपर लीक : सैन्य भरतीची परीक्षा रद्द…….!

पुणे दि.१ – सैन्य भरती परिक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर रविवारी देशभरात विविध ठिकाणी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. लष्कराची गुप्तचर संस्था आणि पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने कारवाई करुन पेपर लिक करण्याचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन ठिकाणी समांतर कारवाई करण्यात आली असून विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती येथून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरील प्रकरणी लष्करातून सेवानिवृत्त वडिलांच्या मुलाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हा मुळचा सांगली जिल्ह्यातील तासगावचा रहिवासी आहे. अली अख्तर, महेंद्र सोनवणे, आझाद खान हे तिघे सैन्यभरतीचे पेपर लिक करणार असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती. तसेच हे पेपर आदल्या दिवशी उमेदवारांना पुरवले जाणार असल्याचे समजले होते. त्यानुसार एकत्रपणे छापे घालून कारवाई करण्यात आली आहे.

शेअर करा
Exit mobile version