Site icon सक्रिय न्यूज

ज्यांच्यावर आरोप होतात त्यांनी स्वतः होऊन निर्णय घ्यावा – पंकजा मुंडे…..!

ज्यांच्यावर आरोप होतात त्यांनी स्वतः होऊन निर्णय घ्यावा – पंकजा मुंडे…..!
बीड दि.१ – पूजा चव्हाण प्रकरणाची निःपक्षपाती पणे चौकशी व्हावी. तसेच ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनीच निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी आमच्या पक्षाची भूमिका असल्याचे वक्तव्य माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
          पत्रकार परिषदे दरम्यान पंकजा मुंडे यांनी विविध विषयांवर स्पष्ट विचार मांडले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आघाडी टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टीत तडजोड केली जाऊ नये. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे का ?  या प्रश्नावर त्यांनी त्यांच्या पक्षाने ठरवले पाहिजे व ज्यांच्यावर बोट दाखवले जात आहे त्यांनी स्वतः होऊन राजीनामा दिला पाहिजे असे उत्तर दिले.
          तसेच चित्रा वाघ ह्या केवळ महिला आहेत म्हणून त्यांच्या बाबतीत फोटो मॉर्फ करण्यासारखे गलिच्छ प्रकार झाले असल्याचे पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवले.
शेअर करा
Exit mobile version