गेवराई दि. २ – गेल्या आठवडा भरापुर्वी गेवराई तालुक्यातील संगम जळगाव याठिकाणी आपल्याच शेतात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. यामध्ये पत्नीनेच पतीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राजकूमार आश्रूबा बडे (५१) रा. संगम जळगाव ता. गेवराई असे मयताचे नाव असुन ह्या ईसमाचा त्याच्याच शेतात मृत्यूदेह आढळला होता. मात्र नातेवाईकांनी या प्रकरणी फिर्याद देण्यास नकार दिला होता . परंतू पोलीसांनी मयताचा वैद्यकीय अहवाल मागवला असता गळा आवळल्याने गूदमरून मृत्यु झाला असल्याचा अंदाज डॉक्टरानी वर्तवल्यानंतर बीट आमलदार विठ्ठल देशमुख यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला होता .
दरम्यान सगळी माहिती व पुरावे यांच्या आधारावर आपल्याच पतीचा खुन पत्नी मिराबाई राजकुमार बडे यांनी केला असल्याच्या संशयावरून तपास अधीकारी यांनी अटक करून न्यायलयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपास अधीकारी प्रफुल्ल साबळे यांनी दिली आहे.