परळी दि.२ – पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी पाच कोटी घेतल्याचा आरोप शांताबाई राठोड यांनी केला होता. मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांच्याविरोधात परळी शहर पोलिसात तक्रार दाखल केेली आहे.
शांताबाई यांनी लहू चव्हाण यांच्यावर पाच कोटी रुपये घेऊन तोंड बंद केल्याचा आरोप केला होता. या आरोपावरुन संतापलेल्या लहू चव्हाण यांनी बदनामीची तक्रार करत शांताबाई या पूजाची आजी नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमच्या भावकीत कदाचित त्या असतील पण गेल्या 25 वर्षांपासुुन आमची आणि शांताबाईंची भेट नाही. त्यामुळे चौकशी करून मग पुढील कारवाई करायला पाहीजे असेही लहू चव्हाण म्हणाले आहेत.
दरम्यान, पूजा चव्हाणच्या प्रकरणात संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे प्रकरण थांबेल असे वाटत असतानाच पुन्हा हे आरोप प्रत्यारोप होत असल्याने दिवसेंदिवस तिढा वाढत चालला आहे.