केज दि.२ – माहेरहून घर बांधकामासाठी एक लाख रुपये घेऊन का येत नाहीस या कारणावरून एका २७ वर्षीय विवाहित महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करीत तिला घराबाहेर काढले. याप्रकरणी पती, सासू, सासऱ्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील क्रांती नगर माहेर असलेल्या एका 27 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून सदरील महिलेचा पती सचिन पेठे, सासू आशाबाई पेठे, सासरा दादाराव पेठे रा.गावसुद ता.जि. उस्मानाबाद या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करत आहेत.
युसुफ वडगाव पोलीसात विनयभंग व ऍट्रोसिटी चा गुन्हा दाखल………!
केज तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय महिलेला फोनवरून त्रास देऊन व घरात घुसून लज्जास्पद कृत्य केल्या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीसात राजेंद्र नामदेव लांडगे रा.पाथरा याच्या विरोधात विनयभंगाचा व ऍट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास केजचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये हे करत आहेत.