Site icon सक्रिय न्यूज

युसूफवडगांव येथे विघ्नसंतोषी डोक्याचा प्रताप……!

सचिन उजगरे / युसुफ वडगाव
 केज दि.३ –   तालुक्यातील युसूफवडगांव येथील बाबु खरबड यांच्या शेतातील केशर अंब्याचे १७ झाडे अज्ञात विघ्नसंतोषी व्यक्तीने अंधाराचा फायदा घेऊन तोडून टाकले आहेत.
                   बाबु खरबड यांनी सर्वे नं १४६ मध्ये आपल्या राहत्या घरामागील शेतात गेल्या दोन तीन वर्षापुर्वी १७ केशर अंब्याची लागवड केली होती. संगोपनासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणीची व्यवस्था केली होती.पहिल्या वर्षी पाण्याची कमतरता झाल्यामुळे डोक्यावरून पाणी आणुन झाडांना दिले, पण झाडे वाळु दिली नाही.साधारण पणे त्यांची आता ५/६ फुट वाढ झालेली होती. मात्र अशी जीवापाड जपलेली केशर अंब्याची झाडे काल रात्री अज्ञात इसमाने अंधाराचा फायदा घेऊन ती बुडा पासुन कोयत्याने तोडुन टाकली.याप्रकरणी बाबु खरबड यांच्या फिर्यादीवरून युसूफवडगांव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेअर करा
Exit mobile version