Site icon सक्रिय न्यूज

औरंगाबाद मध्ये धक्कादायक प्रकार, आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दिले चौकशीचे आदेश……!

औरंगाबाद मध्ये धक्कादायक प्रकार, आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दिले चौकशीचे आदेश……!

Stop Sexual abuse Concept, stop violence against Women, international women's day

औरंगाबाद दि.४ – राज्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये आता औरंगाबादमधील डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या घटनेची भर पडली आहे. औरंगाबादच्या पदमपुरा कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा  प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचे समजते. रात्रीच्यावेळी कोविड सेंटरमध्ये राऊंडवर असलेल्या डॉक्टरने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड करताच डॉक्टरने तेथून पळ काढला. ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशीला सुरुवात केली आहे.

दरम्यान औरंगाबाद चे आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सदरील घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून सदरील प्रकार नेमका काय आहे हे स्पष्ट होईल.

शेअर करा
Exit mobile version