केज दि.४ – एका २५ वर्षीय विधवा महिलेच्या घरात घुसून तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत नराधमाने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या नारायण प्रल्हाद तांदळे ( रा. कोरेगाव ता. केज ) या नराधमास अटक केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना आरोपी नारायण तांदळे याला जेरबंद केले. पीडितेला उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून आरोपीला आज ५ मार्च रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपासी अधिकारी सपोनि संतोष मिसळे यांनी दिली.