Site icon सक्रिय न्यूज

प्राणाची बाजी लावून अंगणवाडी कार्यकर्तीने वाचविला मुलाचा जीव……!

केज दि.५ – स्वतः च्या जीवाची पर्वा न करता एका पंधरा वर्षीय मुलाचे अंगणवाडी कार्यकर्तीने प्राण वाचवल्याची घटना तालुक्यातील कोरेगाव येथे घडल्याने सर्वत्र अंगणवाडी कार्यकर्ती महिलेच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
             दि. ३ मार्च रोजी दुपारी २:३० वा. च्या दरम्यान केज तालुक्यातील कोरेगाव येथील उंबराचा माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातील विहिरी जवळ एक लहान मुलगा मोठमोठ्याने ओरडून मदतीसाठी आरडा ओरड करीत होता. त्याच वेळी विहिरी पासून काही अंतरावर गव्हाची कापणी करणाऱ्या उर्मिला लक्ष्मण शिनगारे या अंगणवाडी कार्यकर्तीने हा आरडा ओरडा ऐकला आणि त्या विहिरीकडे धावत गेल्या. तसेच शेतात काम करीत असलेल्या इतर महिलाही विहिरी भोवती जमा झाल्या होत्या. त्यांनी विहिरीतील दृश्य पाहून त्या घाबरल्या. तसेच विहिरीत उतरण्याची कुणाची हिम्मत होत नसताना उर्मिला शिनगारे यांनी त्या पाण्याने डबडबलेल्या चार ते साडेचार परस विहिरीत वैभव बळीराम लांब नावाचा एक चौदा ते पंधरा वर्षाचा मुलगा गटांगळ्या खात होता. हे पाहून उर्मिला शिनगारे यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता किंवा स्वतःच्या जिवाची पर्वा न करता विहिरी उडी मारली आणि वैभव याला पकडून आधार दिला व त्याला वर काढले.
                            आम्हाला दि. ४ मार्च रोजी आमच्या अंगणवाडीच्या कार्यकर्तीने एका पाण्यात बुडणाऱ्या मुलाचा प्राण वाचविला याचा आम्हाला अभिमान आहे. याची दखल घ्यायला हवी.” अशी भावना केजच्या महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती शोभा लटपटे यांनी व्यक्त केली.
                 ज्यावेळी मी मुलाचा आवाज ऐकून विहिरीकडे पळत गेले आणि पाहिले तर तो बुडत असल्याचे दिसले. तेव्हा मी मागचा पुढचा विचार न करता विहिरीत उडी मारली आणि सुदैवाने मला पोहता येत होते. त्यामुळेच मी त्याचा जीव वाचवू शकले. असे उर्मिला शिनगारे यांनी अभिमानाने सांगितले.
शेअर करा
Exit mobile version