Site icon सक्रिय न्यूज

बलात्कार प्रकरणातील आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी 

बलात्कार प्रकरणातील आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी 
केज दि.५ – घरात घुसून मुलाला जीवे मारण्याची धमकी देत एका २५ वर्षीय विधवा महिलेवर बळजबरीने बलात्कार करणाऱ्या नारायण प्रल्हाद तांदळे ( रा. कोरेगाव ता. केज ) याला केज पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली होती. त्याला केज न्यायालयासमोर हजर केले असता ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
     केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील २५ वर्षीय विधवा महिला ही आपल्या लहान मुलासह घरात झोपली होती. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री आठ वाजता पीडित महिला ही आपल्या मुलासह एकटीच असल्याची संधी साधून आरोपी नारायण प्रल्हाद तांदळे ( रा. कोरेगाव ता. केज ) हा तिच्या घरात घुसला. त्याने तिच्या लहान मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेच्या तोंडावर टॉवेल लावून बळजबरीने बलात्कार केला. ४ मार्च रोजी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नारायण तांदळे याच्याविरुध्द केज पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी नारायण तांदळे याला तातडीने जेरबंद केले होते. शुक्रवारी आरोपी नारायण तांदळे याला केज कोर्टासमोर हजर केले असता त्याला ८ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version