Site icon सक्रिय न्यूज

तोंडाला मास्क लावा म्हणाल्यावरून वाहकाला प्रवाशाची मारहाण ; केज येथील घटना……!

तोंडाला मास्क लावा म्हणाल्यावरून वाहकाला प्रवाशाची मारहाण ; केज येथील घटना……!
 केज दि.६ – वाहकाने बसमधील प्रवासाला तोंडाला मास्क लावण्यास सांगितले असता प्रवासाने शिवीगाळ करीत वाहकाला बसमध्ये खाली पडून लाथाबुक्याने मारहाण करीत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना माजलगाव – सोलापूर बसमध्ये केज शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर शनिवारी घडली. याप्रकरणी त्या प्रवासाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
         माजलगाव आगारातील चालक अंकुश रामभाऊ चव्हाण व वाहक नारायण बाळू पवार ( वय ४६, रा. समता कॉलनी माजलगाव ) हे दोघे शनिवारी सकाळी ८.४५ वाजता माजलगावहुन माजलगाव – सोलापूर ही बस ( एम. एच. २० बीएल २१५३ ) घेऊन सोलापूरकडे निघाले होते. सकाळी १०.४० वाजेच्या सुमारास केज बसस्थानकातून बसलेल्या सुरज विठ्ठल गुरव ( रा. विठ्ठल नगर, केज ) या तरुण प्रवासाने बस ही शहरातील एसबीआय बँकेसमोर गेल्यानंतर  कळंबचे तिकीट घेऊन चिंचोली फाट्यावर सोडण्यास सांगितले. त्यास वाहक नारायण पवार यांनी तोंडाला मास्क लावण्यास सांगितले असता सूरज गुरव याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिव्या का देता असे म्हणताच सूरज याने वाहक पवार यांच्या तोंडावर हातावर चापटाबुक्याने मारहाण करीत त्यांना बसमध्ये खाली पाडून पायावर लाथा मारत मुकामार दिला. यावेळी बसमधील प्रवासी लक्ष्मण ढाकणे ( रा. सारुळ ता. केज ), चितांबर राऊत ( रा. पिंपरी शिराढोण ता. केज ) व चालक अंकुश चव्हाण यांनी सोडवासोडव करीत बस केजच्या पोलीस ठाण्यात आणली. वाहक नारायण पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रवासी सूरज गुरव याच्याविरुद्ध मारहाण, शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version