Site icon सक्रिय न्यूज

पत्नीच्या आत्महत्येनंतर अवघ्या पाच दिवसांतच पतीचीही आत्महत्या……..!

पत्नीच्या आत्महत्येनंतर अवघ्या पाच दिवसांतच पतीचीही आत्महत्या……..!

उस्मानाबाद दि.८ – पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने महिलेवर बंदुकीचा धाक दाखवुन वारंवार बलात्कार केला असल्याचा खुलासा एका चिठ्ठीत करून त्या महिलेने  2 दिवसांपुर्वी आत्महत्या केली होती. पोलिस दलातील या कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळुनच सदरील महिलेनं आत्महत्या केली असल्याचा आरोप तिच्या पतीनेही केला. पण आता या प्रकरणाला वेगळं वळण प्राप्त झालं आहे.

सदरील महिलेच्या पतीने एक व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकाॅर्ड करून त्यानंतर आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आत्महत्या का करतोय आणि त्याला जबाबदार कोण? या सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. पोलीस कर्मचारी हरीभाऊ कोळेकर याने आपल्या पत्नीवर वारंवार बंदुकीचा धाक दाखवुन वारंवार बलात्कार केला आणि त्यानंतर तिने आत्महत्या केली. आता माझ्या सासरकडच्या मंडळींनी माझ्याविरूद्ध कट रचुन या प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि बायकोच्या आत्महत्येला मी जबाबदार आहे, असा आरोप करून शिवागाळ करत आहेत.

व्हिडीओमध्ये त्या महिलेच्या पतीने आत्महत्या करण्याचं कारण म्हणजे हरिभाऊ कोळेकरने माझा हसता खेळता परिवार उध्वस्त केला. त्याला तर फाशी झाली पाहीजे. तो म्हणे कि, माझे वरपर्यंत संबंध आहेत. मी या प्रकरणातून सहज बाहेर पडेल. अशाप्रकारे त्याने आपल्या व्हिडीओमध्ये उल्लेख करून माझ्या प्राॅपर्टीमध्ये मुलीला झुकतं माप देऊन तिला 40 टक्के हिस्सा देण्यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावे ही शेवटची इच्छाही बोलून दाखवली आणि औसा तालुक्यातील टाका या गावात आत्महत्या केली आहे.

दरम्यान संबंधित आरोपीने सप्टेंबर 2020 पासून वेळोवेळी बंदुकीचा धाक दाखवुन बलात्कार केला असल्याचं तिच्या पतीने केलेल्या तक्रारीत म्हटलं होतं. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात होणारे स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचं चित्र दिसुन येत आहे. त्यातच अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत.

शेअर करा
Exit mobile version