Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील शेतकऱ्याचे सिरसाळा तेलगाव रोडवर अपघाती मृत्यू…….!

केज तालुक्यातील शेतकऱ्याचे सिरसाळा तेलगाव रोडवर अपघाती मृत्यू…….!

(बस….प्रतिकात्मक फोटो)

परळी दि.8 – दिवसभर शेतात काबाडकष्ट करुन सायंकाळी घराकडे परतत असलेल्या शेतकऱ्याच्या बैलगाडीला एसटी बसने धडक दिली. या अपघातात शेतकऱ्यासह एक बैल जागीच ठार झाला. हा अपघात शनिवारी (दि.०६) सायंकाळी सिरसाळा तेलगाव रोडवरील खामगाव फाट्यानजीक झाला. संदिपान लक्ष्मण केकान (रा. केकानवाडी ता. केज, हल्ली मुक्काम तपोवन ता. परळ) असे त्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

                 मागील एक वर्षापासून तपोवन येथील एका शेतकऱ्याची जमीन ते बटईने करत आहेत. शनिवारी सायंकाळी सात वाजता ते शेतातील दिवसभराचे काम आटोपून बैलगाडीतून घराकडे निघाले होते. वाटेत फाट्यानजीक बीडधून येणाऱ्या त्रंब्यकेश्वर-परळी बसने (एमएच १४ बीटी ४४४९) त्यांचं बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बैलगाडी जागेवर मोडून संदीपान केकान गंभीर जखमी झाले आणि एक बैल जागीच ठार तर दुसरा जखमी झाला.या अवस्थेत संदीपान यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारा दरम्यान ९ वाजताच्या सुमारास संदीपान केकान यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लक्ष्मण केकान यांच्या फिर्यादीवरून बसचालकावर सिरसाळा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

शेअर करा
Exit mobile version