Site icon सक्रिय न्यूज

व्यापाऱ्यांनी 15 मार्च पर्यंत कोरोना टेस्ट करून घेणे बंधनकारक अन्यथा कारवाई……!

व्यापाऱ्यांनी 15 मार्च पर्यंत कोरोना टेस्ट करून घेणे बंधनकारक अन्यथा कारवाई……!
बीड दि.८ – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसत आहे. मात्र जिल्ह्यातील लोकांमध्ये पाहिजे तेवढे गांभीर्य दिसत नाही. मागच्या पंधरा दिवसांपूर्वी व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याची मोहीम राबवण्यात आली, मात्र व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पुन्हा एकदा आदेश काढले असून जोपर्यंत टेस्ट करून घेणार नाहीत तोपर्यंत दुकाने उघडता येणार नाहीत अश्या सक्त सूचना दिल्या आहेत.
                 कोरोनाच्या वाढत्या आकडेवारी च्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी असे जिल्हा प्रशासनाने सूचित केले होते. त्यासाठी 27 फेब्रुवारी ते 6 मार्च हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र कांही अपवाद वगळता व्यापाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली. एका अर्थाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंगच केला होता.
                दरम्यान सदरील दुर्लक्षितपणा जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्याने आता पुन्हा एकदा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दि. 8 मार्च रोजी व्यापाऱ्यांनी येत्या 15 तारखेपर्यंत स्वतःची कोरोना टेस्ट करून घेण्याचे आदेश काढले आहेत. तसेच सर्व व्यापारी जोपर्यंत टेस्ट करून घेत नाहीत त्यांना दुकाने उघडता येणार नसून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे आतातरी सर्व व्यापारी कोरोना टेस्ट करून घेतील अशी अपेक्षा आहे. संबंधित तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांनी उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचेही सूचित केले आहे.
शेअर करा
Exit mobile version