किल्लेधारूर दि.9 – तालुक्यातील अंजनडोह येथे सातवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थीनी रेणूका शंकर रेपे वय 13 वर्ष हिने सोमवारी सांयकाळचे वेळी घरातील आढू ला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू म्हणून नोद करण्यात आली आहे.
अंजनडोह येथील नुतन माध्यमीक विद्यालयातील सातवी वर्गात शिकणारी रेणुका शंकर रेपे (13) या मुलीने घरात कोणी नसताना सोमवारी सांयकाळी घरातील आढूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटने मुळे मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.