केज दि.९ – एका १५ वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना केज शहरातील क्रांतीनगर भागात घडली असून याप्रकरणी केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील क्रांतीनगर भागातील फिर्यादी रत्नमाला अशोक काळे या महिलेचा मुलगा रघुनाथ अशोक काळे ( वय १५ ) हा ७ मार्च रोजी रात्री घरी होता. तर रात्री ७ ते ९ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी रघुनाथ काळे याचे अपहरण केले आहे. त्याचा शोध घेऊन त्याचा कुठे ही तपास लागला नाही. शेवटी रत्नमाला काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. जमादार प्रभाकर नखाते हे पुढील तपास करत आहेत.