Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील व्यापाऱ्यांसाठी कोरोना टेस्ट चा सुधारित कार्यक्रम जाहीर…….!

केज तालुक्यातील व्यापाऱ्यांसाठी कोरोना टेस्ट चा सुधारित कार्यक्रम जाहीर…….!
केज दि.१० – दिवसेंदिवस कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी सरकारी पातळीवरून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन होताना सर्रास दिसून येत आहे. मागच्या महिन्यात कोरोना टेस्ट च्या मोहिमेकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या आदेशावरून केज तालुक्यातील व्यापाऱ्यांसाठी पुन्हा एकदा कोरोना टेस्ट करून घेण्यासाठी तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
              सदरील वेळापत्रकानुसार दि.११ मार्च ते 15 मार्च पर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी स्वतः ची कोरोना टेस्ट करून घेणे बंधनकारक केले असून त्याशिवाय दुकान उघडता येणार नसल्याचे स्पष्ट सूचित केले आहे.
           दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांनी कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version