मुंबई दि ११ – ‘राज्यसेवा पुर्व परीक्षा’ पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आक्रमक पवित्रा घेतला होता. यावरून राज्य सरकारवही टीका होत होती. मात्र यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे.
एमपीएससीची पूर्व परीक्षा घेतली जाणार असून मी वचन देतो की आठवडाभरात परीक्षा होणार आहे. परीक्षेची तारीख ही उद्या जाहीर करणार आहे. विद्यार्थ्यांनी आपली तयारी चालू ठेवावी, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी परीक्षार्थाींना केलं आहे. त्यासोबतच त्यांनी वयोमर्यादेवरही स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान ज्या उमेदवाराला ही परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली आहे त्यांना वयोमर्यादेची अट आडवी येणार नाहीस असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. मी स्वत: मुख्य सचिवांना आणि एमपीएससीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.