Site icon सक्रिय न्यूज

वाळू तस्कराच्या आवळल्या मुसक्या…….!

वाळू तस्कराच्या आवळल्या मुसक्या…….!
बीड दि. 12 – गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती एसपींच्या विशेष पथकाला झाल्यानंतर त्या ठिकाणी शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता सदरील पथकाने धाड टाकली, या धाडीत आठ ट्रँक्टरसह वाळू असा एकूण 58 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                    गोदावरी नदी पात्रातून सर्रासपणे अवैध वाळू उपसा होत आहे. खामगाव, सावरगाव घाट येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांच्या विशेष पथकाचे पथकप्रमुख एपीआय विलास हजारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता सावरगाव घाट येथील गोदावरी नदी पात्रात धाड टाकली असता त्या ठिकाणी त्यांना आठ ट्रॅक्टर मिळून आले. पोलीसांनी आठही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ते गेवराई पोलीस ठाण्यात आणले. या कारवाईत पथकाने एकूण 58 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेला सर्व मुद्देमाल गेवराई पोलिस ठाण्यात आणण्यात आला असून सदर ट्रक्टर चालक आणि मालक अशा एकूण 16 जणांवर गेवराई पोलीसात गुन्हा नोंद नोंद करण्यात आला आहे.
           दरम्यान एपीआय विलास हजारे यांनी मागच्या दोन महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी केलेल्या कारवायांमुळे वाळू तस्कर धास्तावले असून वाळू चोरीवर मोठया प्रमाणावर प्रतिबंध लागला आहे.
शेअर करा
Exit mobile version