केज दि.१२ – तालुक्यात वीज चोरीचे प्रमाण वाढल्याने रोहित्र जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून वीज गळतीच्या प्रमाणात वाढ झाल्याने केज विद्युत वितरण कंपनीने वीज चोरां विरुद्ध कारवाईची मोहीम चालू केली आहे. यामध्ये चाळीस जणा विरुद्ध वीज चोरीची कारवाई करत ३ लाख ८७ हजार ३९० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला असून २७ जणा विरुद्ध अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर
यांनी दिली आहे.
केज तालुक्यात वीज चोरी
मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने केज उप विभागातील सहा शाखेत रोहित्र जळण्याचे व नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. केज तालुक्यातील नायगाव, सुकळी येथे आवाड शिरपूरा, भालगाव, बावची, कवडगाव इत्यादी गावात वीज चोरी करणाऱ्या विरुद्ध अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर केज शहरातील सात विद्युत ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली असून या सात ग्राहकांनी विद्युत मीटर मधून वीज चोरी केल्याचे आढळून आले असल्याने त्यांना दंडाची आकारणी करण्यात आली आहे. मात्र दंडाची रक्क्म न भरल्यास त्यांच्या विरुद्ध अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांनी दिली आहे.
सदरील कारवाई विद्युत वितरण कंपनींचे मुख्य अभियंता श्री. कोलप यांच्या मार्गदर्शनाखाली केज विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर ,सहायक अभियंता अमोल मुंडे, सचिन चव्हाण, रोशन रामेकर, रामराव नाकाडे व केज उपविभागातील वीज कर्मचारी यांनी केली आहे.