Site icon सक्रिय न्यूज

पिंपळगाव येथे एकाची विष प्राशन करून आत्महत्या…….! 

पिंपळगाव येथे एकाची विष प्राशन करून आत्महत्या…….! 
केज दि.१२ – एका ६५ वर्षीय इसमाने विषारी औषध प्राशन केल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. जालिंदर व्यंकट घोळवे ( पिंपळगाव ता. केज ) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव असून त्यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नाही.
        पिंपळगाव येथील जालिंदर व्यंकट घोळवे ( वय ६५ ) यांनी ७ मार्च रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वार्ड क्र. १२ ( ए ) आयसीयू वार्डात त्यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ११ मार्च रोजी रात्री गहिनीनाथ जालिंदर घोळवे यांनी दिलेल्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार बाळकृष्ण मुंडे हे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version