Site icon सक्रिय न्यूज

लाचखोर अधिकाऱ्याचा निर्लज्जपणाचा कळस……!

लाचखोर अधिकाऱ्याचा निर्लज्जपणाचा कळस……!

लातूर दि.१३ – नियुक्तीचे आदेश काढण्यासाठी आधिकारी लाच घेत असल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. पण आता अधिकाऱ्यांनी हद्दच पार केल्याची घटना समोर आली आहे. अंनुकंपा तत्वावर शिक्षिकेची नोकरी देण्यासाठी लातूर जिल्हातील जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याने चक्क ऑर्डर काढण्यासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लातूर शहरात एका शिक्षण संस्थेत नोकरी मिळावी यासाठी नियुक्तीपत्र द्यावे, अशी मागणी पिडीता आणि तिची आई 2007 पासून करत आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात त्यांनी अनेक वेळा चक्रा मारल्या होत्या. त्यानंतर आता पैसे नसतील तर शरीर दे, त्यानंतर ऑर्डर काढतो, असं वक्तव्य अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप पिडीत महिलेनं केला आहे.

पिडीतेच्या वडिलांचे 2007 मध्ये निधन झालं. त्यानंतर अंनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी पिडीतेने अर्ज केला. दरम्यान तिनं शिक्षक पदासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे तिला शिक्षण संस्थेत नोकरी मिळावी असा अर्ज तिने केला होता, या अर्जावरून अधिकाऱ्याने पिडितेकडे शरीरसुखाची मागणी केली.

दरम्यान, या प्रकरणात लातूरच्या शिवाजीनगर पोलिस चौकीत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस अधिक चौकशी करत आहेत. तर संबंधीत अधिकाऱ्याने त्याच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version