Site icon सक्रिय न्यूज

चोरट्यांची नजर पशुधनावर, केज पोलीसात गुन्हा दाखल…….!

चोरट्यांची नजर पशुधनावर, केज पोलीसात गुन्हा दाखल…….!
केज दि.१३ – गोठ्यात बांधलेली बैलजोडी तिघा चोरट्यांनी  सोडून घेऊन जाताना एका चोरट्यास रंगेहाथ पकडले. तर त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. ही घटना केज तालुक्यातील तुकुचीवाडी शिवारात १३ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी केज पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
        केज तालुक्यातील तुकुचीवाडी येथील शेतकरी शेषेराव उत्तम मोराळे यांनी त्यांच्या मालकीची बैलजोडी ही १२ मार्च रोजी रात्री तुकुचीवाडी शिवारातील शेतातील कोठ्यात बांधली होती. १३ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास विजय फुलचंद राख ( रा. कोरडेवाडी ता. केज ) व त्याच्या दोन साथीदारांनी शेषेराव मोराळे यांची बैलजोडी कोठ्यातून सोडून चोरून घेऊन जात होते. जिवाचीवाडी शिवारात या बैलजोडी चोरट्यांना शेतकऱ्यांनी पाहिले. त्यांनी विजय राख याला पकडले. तर त्याचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून गेले. शेतकऱ्यांनी विजय राख या चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. शेषेराव मोराळे यांच्या फिर्यादीवरून विजय राख याच्यासह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार बाळकृष्ण मुंडे हे पुढील तपास करत आहेत.
            दरम्यान, विजय राख याला कोर्टासमोर हजर केले असता त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
शेअर करा
Exit mobile version