Site icon सक्रिय न्यूज

आनेगाव येथे सोयाबीन पिक जाळले ; ८५ हजाराचे नुकसान…….! 

आनेगाव येथे सोयाबीन पिक जाळले ; ८५ हजाराचे नुकसान…….! 
 केज दि.१६ – शेतात काढून ठेवलेला सोयाबीन पिकाचा ढीग एक जणाने जाळून ८५ हजार रुपयांचे नुकसान केले. उलट शेतकऱ्यास तुला करायचे ते कर अशी धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील आनेगाव येथे घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       आनेगाव येथील शेतकरी प्रचंड सोपान हंडीबाग यांची सर्वे नं. १ मधील गावखोर नावाच्या शेतातील सोयाबीनचे पीक काढून त्याचा ढीग घालून ठेवला होता. १४ मार्च रोजी रात्री १० ते १५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान बाळासाहेब छबु हंडीबाग ( रा. आनेगाव ) याने सोयाबीन पिकाचा ढीग पेटवून देत ८५ हजार रुपायांचे नुकसान केले. बाळासाहेब याने मी तुझे सोयाबीनचे पीक जाळले असून तुला काय करायचे ते कर अशी धमकी देत निघून गेला. अशी फिर्याद प्रचंड हंडीबाग यांनी दिल्यावरून बाळासाहेब हंडीबाग याच्याविरुध्द युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अंगद पिंपळे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version