Site icon
सक्रिय न्यूज

डॉ. शालिनीताई कराड (गदळे) यांना राष्ट्रीय पुरस्कार…….!

डॉ. शालिनीताई कराड (गदळे) यांना राष्ट्रीय पुरस्कार…….!
बीड दि.१७ – दिल्ली येथे आयोजित आत्मनिर्भर महिला, आत्मनिर्भर भारत परिषदेत डॉ.शालिनीताई कराड यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. नॅशनल एक्सलन्स अवार्ड व राष्ट्रीय आरोग्य रत्न हे दोन पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष दादा इधाते तसेच केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले, राज्यसभा सदस्य खा.डॉ.भागवतराव कराड यांच्यासह अनेक मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थिती होती. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात सोमवार, दि. १५ मार्च रोजी हा नेत्रदीपक पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
             किशोरवयीन मुलींचे आरोग्य, स्त्रियांचे आरोग्य, सुरक्षितता, शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय दर्जा उंचावण्यासाठी केलेल्या अनेक कामांची दखल घेऊन डॉ.शालिनीताई कराड यांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. यावेळी डॉ.शालिनीताई म्हणाल्या की, गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहुन लोकोपयोगी कामे करण्यासाठी माझे आईवडील, पती डॉ.बालासाहेब कराड आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले. आज हा पुरस्कार स्वीकारत असतांना मी केलेल्या कामाची पावती मला भेटल्याची भावना निर्माण होत असून भविष्यात आणखी कामे करण्याची ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळत आहे. देशभरातून विविध क्षेत्रातील २२ लोकांची ह्या पुरस्कारासाठी निवड झाली, यात डॉ.शालिनीताई कराड यांचा समावेश आहे. पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. केज येथील युवा नेते राहुल गदळे यांच्या त्या भगिनी आहेत.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version