Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात एकास अवैध दारू विक्री करताना पकडले…….!

केज तालुक्यात एकास अवैध दारू विक्री करताना पकडले…….!
केज दि.१८ तालुक्यातील एकुरका येथे पोलिसांनी आज टाकलेल्या छाप्यात अवैधरित्या देशी दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीसह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे
              अधिक माहिती अशी की, दि. १८ मार्च रोजी सायंकाळी ४  वा. च्या दरम्यान केज तालुक्यातील एकुरका शिवारातील गट नंबर ५० मध्ये घरात अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती केज पोलिसांना मिळाल्या वरून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन व पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे बाळासाहेब अहंकारे, सिद्धार्थ डोईफोडे आणि अशोक नामदास यांच्या पथकाने छापा टाकून देशी दारू विक्री करत असलेला अरुण ज्ञानोबा कोकाटे वय  याला बॉबी संत्रा देशी दारुच्या २४१ बाटल्यासह ज्याची किंमत ६ हजार २६६ रु. आहे असा मुद्देमाल ताब्यात घेतले.
                   पोलीस नाईक अशोक नामदास यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस स्टेशनला मुंबई दारूबंदी कायदा ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास हे करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version