केज दि.१९ – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने आव्हान करूनही केज शहरातील काही व्यापाऱ्यांनी कोरोना तपासणी केली नाही. या व्यापाऱ्या विरुद्ध प्रशासनाने कठोर कार्यवाहीचा बडगा उगारत कोवीड तपासणी न करणाऱ्या चार व्यापाऱ्यांची दुकाने सील केली आहेत.
तहसीलदार दुलाजी मेंडके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुहास हजारे, सचिन देशपांडे आणि प्रभारी मुख्याधिकारी सावंत यांच्या पथकाने कठोर कार्यवाही करत एक ऑटोमोबाईल्स दोन कपड्याचे व एक किराणा दुकान सील केले. तसेच यापुढे जर टेस्ट न करता आस्थापना सुरू ठेवल्या तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याच्या सूचनाही श्री.मेंडके यांनी दिल्याने केज शहरातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.