Site icon सक्रिय न्यूज

10 वी 12 वी परीक्षे संदर्भात मोठे बदल…….

10 वी 12 वी परीक्षे संदर्भात मोठे बदल…….

मुंबई दि.२० –  दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा ऑफलाईन (लेखी परीक्षा) पद्धतीनुसार होणार आहे, अशी महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा ही ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार, लेखी परीक्षा ही विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या शाळेतच होणार, वर्गखोल्या कमी पडल्या बाजूच्या शाळेत बैठक व्यवस्था केली जाणार, यंदा 80  गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटं वाढीव वेळ, 40 आणि 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार,दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला 20 मिनिटं, प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा असाईनमेंट पद्धतीने होणार आहेत. विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास त्यासाठी विशेष परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. तर विशेष परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.

कोरोनामुळे लेखी परीक्षा ही तुम्ही शिक्षण घेत असलेल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये परीक्षा घेतली जाईल. जर वर्ग कमी असल्यास इतर शाळेत बैठक व्यवस्था केली जाईल, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या

तसेच यंदा 80  गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटं वाढीव वेळ दिला जाणार आहे. तर 40 आणि 50 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं वाढवून दिली जाणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक तासाला 20 मिनिटं वाढवून देणार आहे. त्याच बरोबर दहावीच्या प्रॅक्टिक्ल परीक्षा यंदा विशिष्ट लेखन कार्य (असाईनमेंट)  पद्धतीने घेतल्या जाणार आहे. विशेष म्हणजे हे असाईनमेंट लेखी परीक्षा संपल्यानंतर शाळेत गृहपाठ पद्धतीने द्यायचे आहेत. हे असाईनमेंट 21 मे ते 10 जूनपर्यंत शाळेत द्यायचे आहे. तर बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 22 मे ते 10 जून यामध्ये होतील. कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेनंतर 15 दिवसात असाईनमेंट सादर करायचे आहेत.

दरम्यान  12 वी विज्ञान शाखेच्या प्रात्याक्षिकांची संख्यादेखील कमी करण्यात आली आहे. कला, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर 15 दिवसांमध्ये असाईनमेंट सादर करावी लागणार आहेत

शेअर करा
Exit mobile version