Site icon सक्रिय न्यूज

पत्नीस पैशाची मागणी करत, अंगावर रॉकेल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस तीन वर्ष सश्रम कारावास…….!

पत्नीस पैशाची मागणी करत, अंगावर रॉकेल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस तीन वर्ष सश्रम कारावास…….!
अंबाजोगाई दि. २० – पैशाची मागणी करत पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतिस तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा अंबाजोगाई अपर सत्र न्यायालय 1ले श्रीमती एस.एस.सापटनेकर यांनी सुनावली आहे.
                       अधिक माहिती अशी की, दि.28/09/2015 रोजी रात्री 10.00 वा. चे सुमारास फिर्यादी मनिषा भ्र. श्रीधर गायकवाड, वय-42 वर्ष, व्यवसाय-शिक्षीका, रा.दहीफळ वडमाऊली, ता.केज. जि.बीड ह.मु.शिक्षक कॉलनी, ता.केज जि.बीड या घरी असतांना यातील फिर्यादीचे पती (प्रकरणातील आरोपी) नामे श्रीधर पंढरी गायकवाड, वय-42 वर्ष, रा. दहीफळ वडमाऊली, ता.केज, जि.बीड हा घरी आला व बिअर शॉपी टाकण्याकरीता पैसे दे, असे म्हणुन फिर्यादी सोबत भांडण करू लागला. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर यातील आरोपीताने घरातील रॉकेलची कॅँड घेऊन फिर्यादीस जिवंत जाळण्याचे उद्देशाने फिर्यादीच्या अंगावर रॉकेल टाकून काडी लावण्याच्या प्रयत्नात असतांना फिर्यादीने आरोपीतास ढकलून देऊन पोलीस ठाणे केज गाठले. पोलीस ठाणे केज येथील पोलीसांनी फिर्यादीस वैद्यकीय उपचाराकामी पत्रक देऊन स.द.बीड येथे रेफर केले.
                    फिर्यादीने स.द. बीड येथे दिलेल्या जबाबावरून पोलीस ठाणे केज येथे गु.र.नं.253/2015 कलम 307,498(अ) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नमुद प्रकरणाचा तपास तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक श्री. गाडेवाड यांच्याकडे देण्यात आला. तपासीक अधिकारी यांनी प्रकरणातील महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवून आवश्यक सर्व पुरावे हस्तगत केले. तपासीक अधिकारी यांनी तपासाअंती आरोपीताविरूध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर मा.न्यायालयास अंतीम दोषारोप पत्र सादर केले. सदर प्रकरणाची सुनावणी मा.अपर सत्र न्यायालय 1ले, अंबाजोगाई यांच्या न्यायालयात झाली. सुनावणीअंती आरोपी विरूध्द दिसून आलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर मा. न्यायालयाने आरोपीस कलम 307 भादंवि मध्ये तीन वर्ष सश्रम कारावास व 3000/- रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरीक्त सश्रम करावास तसेच कलम 498(अ) भादंवि मध्ये एक वर्ष सश्रम करावास व 1000/- रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरीक्त सश्रम करावास अशी शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सहा. सरकारी वकील आर. एम. ढेले यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज पोउपनि अर्जुन चौधर यांनी पाहिले.
शेअर करा
Exit mobile version