Site icon सक्रिय न्यूज

मुलाच्या जन्माचा उत्सव पडला महागात…….!

नांदेड दि.23 – मुलाच्या जन्माचा उत्सव साजरा करत असताना अवघ्या काही दिवसातच त्याच्या आनंदावर विरजण पडलं आहे. मुलगा झाल्याच्या आनंदात २४ वर्षीय तरुणाने गावात पेढे वाटले. नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील काटकळंबा गावात ही घटना घडली. तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने गावाची अक्षरशः झोप उडाली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून परिसर सील केला आहे. गावात आरोग्य कर्मचारी पथक, पोलीस, सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यासह सामाजिक टीमचा राबता वाढला आहे.संबंधित २४ वर्षीय तरुण औरंगाबाद येथील कंपनीत काम करतो. ४ जुलै रोजी मुलगा झाला म्हणून पाहण्यासाठी तो नांदेडमधील कंधार तालुक्यातील गावाकडे आला. आपल्या मुलाला पातंरड येथे भेटला आणि गावाकडे परतला.मुलगा झाल्याच्या आनंदात त्याने गावात, मित्र मंडळीत पेढे वाटले.त्याच्या संपर्कात आतापर्यंत ११६ जण आले असून त्या सर्वांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केलं आहे. रुग्णाच्या घराचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्याचं काम तातडीने चालू केलं आहे. गावात भीतीचं वातावरण पसरु नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

शेअर करा
Exit mobile version