Site icon सक्रिय न्यूज

कोरडेवाडीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण…….! 

कोरडेवाडीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण…….! 

Kidnapped typographic stamp. Typographic sign, badge or logo

केज दि.२३ – एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना कोरडेवाडी ( ता. केज ) येथे २३ मार्च रोजी पहाटे ४ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        कोरडेवाडी येथील १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी ही २२ मार्च रोजी रात्री जेवण आटपून घरात आपल्या कुटुंबियांसह झोपली होती. तिला मध्यरात्री अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी पळवून नेत तिचे अपहरण केले. २३ मार्च रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास तिची आई झोपेतून उठल्यावर मुलगी घरात दिसून आली नाही. तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने तिच्या आईने पोलिसात तक्रार दिली. आईच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version