बीड दि.२३ – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांनी लॉकडाऊनची भूमिका घेतल्यानंतर आता बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन लावले जाणार आहे. २६ च्या मध्यरात्री सुरु होणारे हे लॉकडाऊन ४ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु केले आहे. बीड जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. २५ रोजी सायंकाळी ७ वाजता दुकाने बंद झाल्यानंतर २६ च्या मध्यरात्रीपासूनच संपूर्ण लॉकडाउनच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होईल . सुमारे १० दिवस म्हणजे ४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध राहतील. या संदर्भात अधिकृत आदेश निघाले नसले तरी या माहितीला जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दुजोरा दिला आहे.