Site icon सक्रिय न्यूज

मायलेकरू विहिरीत पडले, आई वाचली मात्र सहा महिन्याच्या बालकाचा मृत्यू……!

मायलेकरू विहिरीत पडले, आई वाचली मात्र सहा महिन्याच्या बालकाचा मृत्यू……!
 केज दि.२४ – सहा महिन्याच्या बाळाला घेऊन आई विहिरीत पडली. मात्र आई वाचली आणि मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना केज तालुक्यातील गोटेगाव येथे घडली आहे. दरम्यान, आई मुलाला घेऊन विहिरीकडे का गेली होती ? याचे कारण स्पष्ट झाले नाही. याबाबत युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
           गोटेगाव येथील सोनाली आबासाहेब बोराडे ही महिला आपल्या सहा महिन्यांच्या ओमकार नावाच्या मुलासह २४ मार्च रोजी सकाळी ५ ते ७ वाजेच्या दरम्यान गावालगतच्या बळीराम बोराडे यांच्या विहिरीत पडली. मात्र विहिरीच्या पाण्यात बुडून ओमकार आबासाहेब बोराडे ( वय ६ महिने ) या बालकाचा मृत्यू झाला. तर आई सोनाली ही वाचली आहे. गणेश शिवाजी सुरवसे ( रा. केज ) यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक अंगद पिंपळे हे पुढील तपास करत आहेत.
     दरम्यान, सोनाली बोराडे ही महिला आपल्या सहा महिन्याच्या मुलाला घेऊन विहिरीकडे कशाला गेली होती. हे स्पष्ट झाले नसून ते तपासात उघड होईल असे पोलिसांनी सांगितले.
शेअर करा
Exit mobile version