Site icon सक्रिय न्यूज

जानेगाव प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची घटनास्थळी भेट………! 

जानेगाव प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची घटनास्थळी भेट………! 
केज दि.२६ – तालुक्यातील जानेगाव येथे महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ माजली होती. सदरील घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून तपासात गती घेतली असून पहाटे पाच वाजेपर्यंत पोलीसांनी घटनास्थळी थांबून घटनेचा वेध घेतला आहे. तर महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून युसुफ वडगाव पोलिसांत अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        तालुक्यातील जानेगाव येथे गुरुवारी (दि.२५) रोजी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान गावाच्या लगत असणाऱ्या घरा पासून कांही मीटर अंतरावर आशाबाई अनुरथ चटप (३८) या महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह बोरीच्या झाडाखाली आढळून आला होता. दरम्यान सदरील घटनेची माहिती युसूफ वडगाव पोलिसांना मिळताच सपोनि संदीप दहिफळे यांनी व विजय आटोळे  यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच उस्मानाबाद येथून डॉगस्कॉड ला ही पाचारण करण्यात आले होते. तर उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी भेट देत तपासला गती दिली आहे.
            सदरील मृतदेहाचे शवविच्छेदन केज येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यासाठी प्रेत आणण्यात आले  होते. मात्र सदरील  मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करण्यासाठी मृतदेह अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
            दरम्यान सदरील घटना घडल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ माजली होती. घटनेची माहिती मिळताच शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते. तर सदरील घटनेने हादरलेले गाव रात्रभर जागे होते. मृत महिलेच्या वडिलाच्या फिर्यादीवरून युसुफ वडगाव पोलिसांत गुरन 48/2021भादवी 302 व 201 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि विजय आटोळे हे  करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version