Site icon सक्रिय न्यूज

तुरळक वाहने वगळता केज शहरात शुकशुकाट……!

तुरळक वाहने वगळता केज शहरात शुकशुकाट……!

तुरळक वाहने वगळता केज शहरात शुकशुकाट……!

केज दि.२६ – गुरुवारी मध्यरात्री नंतर बीड जिल्ह्यात लॉक डाउन लावण्यात आले. व्यापारी वर्गांसह इतर कांही घटकांनी याला विरोध दर्शवला. मात्र शुक्रवारी केज शहरात कांही तुरळक वाहने आणि लोक वगळता संपूर्ण शुकशुकाट दिसून आला. तर कांहीना दंडही भरावा लागला.
             बीड जिल्ह्यात संपूर्ण लॉक डाउन घोषित केल्यानंतर शुक्रवार पासून केज तालुक्यात कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. शहरातील प्रमुख चौकाचौकात पोलीस बंदोबस्त असून येणाऱ्या जाणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तर बसस्थानकासमोर पोलीस आणि नगरपंचायत चे कर्मचारी तळ ठोकून बसले असून विना परवानगी रस्त्यावर येणाऱ्या बेशिस्त नागरिकांना पोलीसी खाक्या दाखवत दंड करत आहेत.
       दरम्यान केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके, मुख्याधिकारी श्री. सावंत तसेच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे तालुक्यात लॉक डाउन नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसून येत आहेत. मात्र कांही बेशिस्त लोक विना परवानगी फिरताना आढळून येतच आहेत.
शेअर करा
Exit mobile version