केज दि.२७ – येथील एका शिक्षकाचे घर फोडून घरातील एलईडी टीव्ही, होम थिएटर व पितळेची भांडी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
येथील समता नगर मध्ये राहणारे शिक्षक अविनाश रामचंद्र गाताडे हे त्यांच्या घराला कुलूप लावून दि.२४ मार्च रोजी सर्व कुटुंबियां सोबत त्यांच्या आईच्या मासिकाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काळेगाव ता. केज येथे मूळ गावी गेले होते. त्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील फ्युटेक कंपनीची एलईडी टीव्ही, सॅमसंग कंपनीचे होम थिएटर आणि पितळेची भांडी असा एकूण १७ हजार रु किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
दरम्यान अविनाश गाताडे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. १४१/२०२१ भा. दं. वि. ४५४, ४५७ व ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सिद्धेश्वर डोईफोडे हे पुढील तपास करीत आहेत.