Site icon सक्रिय न्यूज

अन्यथा होऊ शकतो मोठा दंड……..!

अन्यथा होऊ शकतो मोठा दंड……..!

मुंबई दि.२७ –  कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या नियमांची नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये 27 मार्चपासून म्हणजेच आजपासून कोरोनाबाबत नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमांमध्ये काही नियम असे काही की नागरिकांनी त्या नियमांचं पालन केलं नाही तर त्यांना भुर्दंड बसणार आहे.

आजपासून रात्री 12 वाजल्यापासून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. तसं आढळल्यास 1 हजार रुपये दंड नागरिकांना भरावा लागणार आहे. तर मास्कविना फिरताना आढळल्यास 500 रूपये दंड आकारण्यात येणार आहे.तसेच रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद ठेवण्यात येणार आहेत. होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या वेळेलाही या नियमांचं बंधन असणार आहे. मात्र होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे.  सरकारने घालून दिलेल्या नियमांचं हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या मालकांनी उल्लंघन केल्यास ही सर्व स्थळे कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

शेअर करा
Exit mobile version